लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर झाला आहे. गुणपडताळणीचे अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता पाचवी, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला.

आणखी वाचा-अधोविश्व : १८०० किलोमीटर पाठलाग

विद्यार्थ्यांना नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी आणि गुणपडताळणी करायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये शुक्रवार, १० मे पर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक विषयासाठी ५० रुपये ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. निकाल http://www.mscepune.in व http://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर हा निकाल घोषित करण्यात आला आहे. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल हा त्यांच्या लॉगिनमधून आणि पालकांना विद्यार्थ्यांचा निकाल हा संकेतस्थळावर पाहता येईल.

Story img Loader