लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना घराजवळ नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नायर रुग्णालयाने जानेवारीमध्ये फिरते नेत्रतपासणी केंद्र सुरू केले होते. या फिरत्या नेत्रतपासणी केंद्रात नऊ महिन्यांमध्ये मुंबईच्या विविध भागातील २०७२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी शस्त्रकियेची आवश्यकता असलेल्या नागरिकांना रुग्णालयामध्ये आणून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. नायर रुग्णालयाच्या या फिरत्या नेत्रतपासणी केंद्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन त्याला ‘अकॉईन मसिहा हेल्थ सर्व्हिस इन मुंबई’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मोतीबिंदू, काचबिंदू, चष्म्याचा नबंर, डोळ्यात गेलेला कचरा, डोळ्याला झालेली दुखापत यांसारख्या डोळ्यांच्या विकारांबाबत नागरिकांना घराजवळ उपचाराच्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाने अद्ययावत व सर्व सुविधांनी सुसज्ज वाहनाच्या माध्यमातून फिरते नेत्र तपासणी केंद्र सुरू केले. गोवंडी, ट्रॉम्बे आणि शिवाजी नगर या परिसरासह मुंबईतील झोपडपट्टी परिसरामध्ये रुग्णालयाच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये ज्या नागरिकांमध्ये डोळ्यासंदर्भात विकार आढळून येत आहेत. त्यांच्यावर तातडीने फिरत्या नेत्र तपासणी केंद्रामध्ये उपचार करण्यात येत आहेत. काचबिंदू, मोतीबिंदू किंवा अन्य काही दुखापतींवर शस्त्रक्रिया करणे आवश्य आहे, अशा नागरिकांना नायर रुग्णालयाच्या वाहनातून रुग्णालयात आणण्यात येते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सोडण्याची जबाबदारीही रुग्णालय पार पाडत आहे.
आणखी वाचा-आरोग्य यंत्रणेचा कायापालट! सर्व जिल्ह्यांत अद्ययावत रुग्णालये, मुख्यमंत्र्यांची घोषणा
जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये फिरत्या नेत्र तपासणी केंद्राच्या माध्यमातून २०७२ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. ११२ ग्लुकोमाच्या तर २८२ लहान मुलांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचप्रमाणे मधुमेह रेटिनोपॅथीचा त्रास असलेल्या ७० तर रक्तदाब रेटिनोपॅथीचा त्रास असलेल्या ७२ आणि हा दोन्ही त्रास असलेल्या ५७ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती नायर रुग्णालयातील नेत्र चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. नयना पोतदार यांनी दिली.
नायर रुग्णालयाच्या फिरत्या नेत्रतपासणी केंद्राच्या उल्लेखनीय कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अकॉईन इंटरनॅशनल असेंब्ली ऑफ कम्युनिटी ऑप्थलम २०२३ मध्ये अकॉईन मसिहा ऑफ एक्सलन्स इन कम्युनिटी आय हेल्थ सर्व्हिसेस इन मुंबई’ या पुरस्काराने नायर रुग्णालयातील या सेवेचे गौरव करण्यात आला. नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. नयना पोतदार यांनी हा पुरस्कार विभागाच्या वतीने स्वीकारल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.
फिरत्या नेत्रतपासणी केंद्राची वैशिष्ट्ये
- चष्म्याचा नंबर काढण्याची सुविधा
- नेत्र परीक्षण आसन
- नेत्रदाबमापक यंत्र
- नेत्रपटल परीक्षा यंत्र
- रुग्ण प्रतीक्षा कक्ष
- जनजागृतीसाठी एलईडी टीव्ही
- डॉक्टर-परिचारिका कक्ष