गेल्या तीन दशकांत देशातील अनेक राज्यांमध्ये प्रभाव निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी त्यांनी सुरू केलेल्या युद्धाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच मजल गाठली आहे. जगभरातील अनेक देशांत माओवादी विचारांच्या संघटना व पक्ष स्थापन करून त्यांचा एक आंतरराष्ट्रीय मंच तयार करण्यासाठी नक्षलवाद्यांनी भरपूर प्रयत्न केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
माओवाद्यांच्या गनिमी सेनेचे आव्हान

काही दिवसांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी दिल्ली व उत्तराखंडमध्ये काम करणाऱ्या हेम मिश्रा व प्रशांत राही ऊर्फ सांगलीकर या दोघांना अबुजमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी जात असताना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक जी. एल. साईबाबा (ऊर्फ प्रकाश?) यांच्या निवासस्थानी छापा टाकून या चळवळीशी संबंधित बरीच कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांमधून समोर आलेली माहिती नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रकाश टाकणारी आहे. आजवर देशातील पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणांना नक्षलवादी श्रीलंकेतील लिट्टे, फिलिपाइन्समधील क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष व चीन तसेच नेपाळमधील माओवाद्यांशी संबंध ठेवून आहेत एवढीच माहिती होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत नक्षलवाद्यांनी आंतरराष्ट्रीय विभागाची स्थापना करून अनेक देशांत माओवादी विचारांच्या संघटना तसेच पक्ष तयार करून त्यांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न केल्याचे या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
नक्षलवाद्यांच्या जागतिक जाळ्याचा धक्कादायक तपशील

Story img Loader