‘देशभर २१ जून रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतराष्ट्रीय ‘योग दिना’साठी कोणत्याही शाळेवर सक्ती केलेली नाही. तसेच, योग दिनासाठी कुठलेही शुल्क अथवा पैसे विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याचे आदेश वा निर्देश शाळांना दिलेले नाहीत,’ असा खुलासा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. ‘योग दिनाचा पालकांवर भार’ या मथळ्याखाली काही शाळा योग दिनाच्या निमित्ताने पालकांकडून पैसे उकळत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ८ जून रोजी प्रसिद्ध केले होते. काही शाळा योग दिनासाठी टी-शर्ट्स विकत घेण्याची सक्ती करीत आहेत. तसेच, हा दिवस साजरा करण्याच्या नावाखाली पैसे गोळा करीत असल्याची पालकांची तक्रार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या संदर्भात खुलासा करताना आपल्या विभागाने तरी असे कुठलेही लेखी पत्रक काढले नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
‘योग दिनासाठी शुल्कवसुलीचे आदेश दिलेले नाहीत’
‘देशभर २१ जून रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतराष्ट्रीय ‘योग दिना’साठी कोणत्याही शाळेवर सक्ती केलेली नाही.
First published on: 09-06-2015 at 03:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International yoga day no order to charge students