मुंबई:  कुणाची तरी सुपारी घेऊन राणा दाम्पत्याचा मुंबईत तमाशा सुरू असून एखाद्या ठिकाणी घडलेल्या घटनेवरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचा मुद्दा पुढे करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. पण राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी  सांगितले. राणा दाम्पत्यांच्या मागे कोण आहे हे जनतेसमोर आणले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा धरलेला आग्रह आणि त्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून गृहमंत्र्यांनी  भाजप आणि राणा दाम्पत्याला सुनावले. राज्यात विरोधकांकडून जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला.

Story img Loader