सुशांत मोरे
११ हजार तक्रारींवर केवळ ५० टक्केच कारवाई
उपनगरीय रेल्वेगाडय़ांतील अपंगांसाठीच्या आरक्षित डब्यात घुसखोरी करणाऱ्या अन्य प्रवाशांवर कारवाई करत असल्याचे चित्र रेल्वे प्रशासनाने निर्माण केले आहे, मात्र यासंदर्भातील आकडेवारी वेगळेच चित्र निर्माण करत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे जानेवारी २०१७पासून आतापर्यंत अपंगांच्या डब्यातील घुसखोरीच्या ११ हजार १७ तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यापैकी ५ हजार ५३२ जणांवरच कारवाई करण्यात आली आहे.
अपंगांच्या राखीव डब्यातून प्रवास करण्यास सामान्य प्रवाशांना बंदी असताना याचे सतत उल्लंघन होताना दिसते. त्यामुळे अपंगांना प्रवास करताना अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते. प्रवासावेळी सामान्य प्रवासी व अपंग प्रवाशांमध्ये खटकेही उडतात. त्यासाठी अपंग प्रवाशांकरिता रेल्वेने १८२ ही हेल्पलाइन सुरू केली. येथे घुसखोरांविरोधात तक्रार करून मदत मागविता येते. रेल्वे सुरक्षा दलाकडून लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाते, मात्र अपंग प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणावर तक्रारी येऊ नही कारवाईचे प्रमाण नगण्यच असल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी २०१७ ते आतापर्यत १८२ या हेल्पलाइन क्रमांकावर अपंग प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेवर १ हजार ६०६ तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीनंतर अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्या एक हजार १६९ प्रवाशांवर कारवाई केली गेली. मध्य रेल्वेवर तर तक्रारीचा आकडा खूप मोठा आहे. ९ हजार ४११ तक्रारी हेल्पलाइनवर आल्यानंतर यातील ८ हजार ७८३ तक्रारींची दखल घेण्यात आली. कारवाई मात्र ४ हजार १६३ जणांवरच झाली आहे. नितीन गायकवाड यांनी मध्य व पश्चिम रेल्वेकडून माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे.
अपंगांच्या डब्यात सामान्य प्रवाशांकडून घुसखोरी झाली तर रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई केली जाते, मात्र ती नीट होत नाही. आता तर स्थानकात लोकलचा अपंगांचा डबा ज्या ठिकाणी येतो, तेथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे जवान तैनात करण्यात येतात. मात्र हे जवान तेथे उपस्थित नसल्याचे अनेकदा दिसून येते.
– नितीन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते