लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोणत्याही कारणाशिवाय निवडणूक आयोगाने मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या पुरवणी यादीत १२ हजार नावे समाविष्ट केली नाहीत या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अॅड. अनिल परब यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून परब यांनी दिलेली नावे मतदार यादीत का समाविष्ट झालेली नाहीत याचा शोध सुरू केला आहे. शिवसेनेने काही मतदार केंद्रांबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर आता मतदान केंद्र बदलण्याच्या हालचालीही आयोगाने सुरू केल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी शुक्रवारी दिली.

The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Rajiv Kumar
Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं महाराष्ट्राला पत्र; ‘या’ विषयावर व्यक्त केली नाराजी!
raj thackeray western vidarbh marathi news
राज ठाकरे यांची पश्चिम विदर्भात चाचपणी; उमेदवारांच्या नावांची प्रतीक्षा
assembly election 2024 Prakash Ambedkar announced he will fight independently along with OBC organizations
विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा! म्हणाले…
Efforts by BJP and Shiv Sena Shinde group to make Ajit Pawar group leave the Grand Alliance and contest the assembly elections independently
अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह? भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती
Indian Constitution
संविधानभान : ‘आया राम गया राम’ला रामराम
nanded congress recommended vasant chavan s son for lok sabha by election
वसंत चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची शिफारस; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेड जिल्हा काँग्रेसचा एकमताने ठराव

पुरवणी मतदार यादीमध्ये शिवसेनेने जी नावे नोंदवली होती त्यातील बरीचशी नावे आलेली नाहीत. या मतदारांचे अर्ज स्वीकारल्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत. ज्या वेळेस अर्ज सादर दिला जातो त्या वेळेस तो तपासूनच त्याची पोचपावती दिली जाते. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पोचपावती येते. पोचपावती दिली जात नाही त्या वेळेस तो अर्ज नाकारला जातो आणि त्याची कारणे दिली जातात. अर्ज नाकारण्याची कारणे समजणे हा अधिकार आहे. यंदा अर्ज स्वीकारूनही नावे आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. यात खूप मोठी गडबड असल्याचा अनेक गंभीर आरोप परब यांनी केले होते. तसेच मुसळधार पावसात पाणी साचणाऱ्या ठिकाणी मतदान केंद्रे उभारली आहेत. गैरसोयीची मतदान केंद्रे बदलून द्यावीत अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेचा समिती सदस्य म्हणून अपात्र, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

शिवसेनेच्या या आक्षेपांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने मुंबईतील पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून रद्द झाली आहेत का तसेच नव्याने नोंदणी करण्यात आलेली मतदारांची नावे मतदार यादीत का आलेली नाहीत याची तपासणी करण्याच्या सूचना दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परब यांनी अर्जासोबत दिलेल्या नावांची पडताळणी केली जात असून त्यात प्रशासनाची चूक असेल तर ही नावे पुन्हा समाविष्ट केली जातील. परब यांनी १२ हजार नावांचा मोघम आरोप केला आहे. त्याबाबत आता कसा शोध घेणार असे आयोगातील सूत्रांनी सांगितले. उपनगर जिल्ह्यातील मतदान केंद्राबाबत जे आक्षेप घेण्यात आले आहेत, त्याचीही शहानिशा केली जात आहे.