लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर दुर्घटना प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला उदयपूर येथून अटक केली होती. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.
घाटकोपरमधील महाकाय जाहिरात फलक कोसळल्यानंतर भिंडेने अटकेच्या भीतीने पळ काढला होता. मुंबई पोलिसांचे पथक त्याच्या मुलुंड येथील घरी पोहोचले. पण तो पसार झाला होता. पोलिसांना त्याचे शेवटचे ठिकाण लोणावळा असल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. मात्र तो घटनास्थळी सापडला नाही. त्याचा मोबाइल बंद होता. त्यानंतर त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. लोणावळा येथून तो राजस्थानमध्ये पळाला होता. अखेर भिंडेला उदयपूर येथील रिसॉर्टमधून अटक करण्यात आली. आता त्याच्याविरोधातील हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
आणखी वाचा-दुर्घटनेमुळे ‘रेल्वे पोलीस पेट्रोल पंप’ बंद होण्याच्या मार्गावर?
इगो मीडिया कंपनीचा संचालक भिंडे याच्यावर यापूर्वी मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्ह दाखल आहे. भिंडेने २००९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी महापालिकेच्या परवानगीशिवाय फलक लावल्याप्रकरणी त्याच्यावर २१ वेळा कारवाई करण्यात आली होती. याशिवाय दोन वेळा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात खटले दाखल झाले होते. धनादेश न वठल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत खटला चालविण्यात येतो.
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भिंडेविरोधात भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३८ (गंभीर दुखापत), ३३७ (निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे) व ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता त्याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.