मुंबईः शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. वैयक्तिक वादातून मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने गोळी मारली असून त्याने स्वतःलाही गोळी मारून घेतली होती.

अभिषेक घोसाळकर यांना पाच गोळ्या लागल्या. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. या घटनेमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांची विविध पथके तपासासाठी तैनात झाली.

हेही वाचा – अटल सेतूवरून लवकरच बेस्ट बसप्रवास? कोकण भवन वर्ल्ड ट्रेड सेंटर व्हाया अटल सेतू मार्ग

शुक्रवारी पहाटे याप्रकरणी मॉरीस भाईविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मॉरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेली ही व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणवून घेत होता. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – “…आणि मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या”, प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी सांगितला थरार

अभिषेक घोसाळकर व मॉरिस यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. पण नुकतीच दोघांनीही एकमेकांविरोधातले वाद मिटवून सलोखा केला होता. त्यामुळे मॉरिसने अभिषेक घोसाळकरला साडी वितरण कार्यक्रमाला त्याच्या कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी केबिनमध्ये गेल्यानंतर फेसबुक लाईव्ह करून मॉरिसने गोळ्या झाडल्या. मॉरिसने त्याच्याकडील रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या. त्यानंतर मॉरिसने स्वतःवरही गोळी झाडली.

Story img Loader