मुंबई : ‘कार्डेलिया क्रूझ’वरील छाप्यादरम्यान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला या प्रकरणातून सोडण्यासाठी खंडणी मागणारा खासगी पंच के. पी. गोसावी हा ‘एनसीबी’चा अधिकारी असल्याचे खोटे चित्र उभे करण्यात आले होते. तसेच १७ जणांची नावे संशयित म्हणून वगळून त्यांना सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यात एका कथित अंमलीपदार्थ विक्रेत्याचा समावेश होता, असे आरोप विशेष चौकशी पथकाच्या (दक्षता) अहवालात ठेवण्यात आले आहेत.

‘एनसीबी’च्या दक्षता पथकाच्या अहवालाच्या आधारावर आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह ‘एनसीबी’चे तत्कालिन अधिक्षक विश्व विजय सिंह, तत्कालिन गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन यांच्यासह के. पी. गोसावी, सॅन्विल डिसोझा आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात सीबीआयने खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात स्वतंत्र पंच असलेला के.पी. गोसावीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन ला सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडे २५ कोटींची मागणी केली आणि तडजोडीनंतर १८ कोटी रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती, असेही या अहवालात म्हटले आहे.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Junnar man stealing mobile phones, Kalyan railway station, Dombivli railway station,
कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणारा जुन्नरचा इसम अटकेत
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
kalyan loksatta news
कल्याण : रस्त्यावरील किराणा सामान हटविण्यास सांगितले म्हणून दुकानदाराची मारहाण
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
cybercrime digital arrest scam
Digital Arrest Scam: ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमद्वारे देशभरात हजारो कोटींची लूट करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक

विशेष चौकशी पथकाच्या अहवालानुसार, २ ऑक्टोबर, २०२१ रोजी अंमलीपदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली, तेव्हा काही संशयितांची नावे प्रथम माहिती अहवालातून (आय-नोट) वगळण्यात आली होती आणि इतर काही आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. सुरुवातीच्या ‘आय-नोट’मध्ये २७ संशयीतांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर सुधारित ‘आय-नोट’मध्ये फक्त १० नावे होती. अशा संशयितांच्या संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. पण त्याबाबत कोणतीही कागदपत्रे तयार करण्यात आली नाहीत. तसेच काही संशयित व्यक्तींना कोणत्याही कागदपत्रांशिवाय जाण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय, अरबाज र्मचटला (आर्यन खानचा मित्र) चरस पुरवण्यात मदत करणाऱ्या सिद्धार्थ शाहलाही ‘एनसीबी’च्या या अधिकाऱ्यांनी मोकळे सोडले होते. शहाने त्याला चरससाठी अरबाजकडून पैसे मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच तो स्वत: अंमलीपदार्थाचे सेवन करत असल्याचे संभाषण सापडले होते.

स्वतंत्र पंच के. पी. गोसावी यांच्या खासगी वाहनातून आरोपींना एनसीबी कार्यालयात आणण्यात आल्याचे चौकशीत समजले आहे. तसेच गोसावी हा एनसीबी अधिकारी एसल्याचे चित्र जाणूनबुजून उभे करण्यात आले. एनसीबीचे अधिकारी उपस्थित असतानाही गोसावीला आरोपींना हाताळण्याची मुभा देण्यात आली. ही कृती स्वतंत्र पंचाच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन गोसावीने आरोपीबरोबर सेल्फी काढला आणि त्यांच्या आवाजाची ध्वनिफित तयार केली. त्याच्या वापर करून के.पी. गोसावी आणि त्याचा साधीदार सॅन्वील डिसोझा यांनी आर्यन खानच्या कुटुंबियांकडून आर्यनला अंमलीपदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देऊन २५ कोटींची लाच उकळण्याचा कट रचला. तडजोडीअंती १८ कोटी रुपये घेण्याचे ठरले. गोसावी आणि डिसोझा यांनी लाचेची रक्कम म्हणून ५० लाख रुपये आगाऊ घेतले. परंतु नंतर या रकमेचा काही भाग त्यांना परत करण्यात आला, असे चौकशी अहवालात म्हटले आहे.

मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी, त्यांच्या अधिकारांत के. पी. गोसावी आणि प्रभाकर साईल यांना आरोपींविरुद्धच्या कारवाईत स्वतंत्र पंच म्हणून घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच तत्कालीन एनसीबी अधीक्षक व्ही.व्ही. सिंह यांना गोसावी यांना आरोपींना हाताळू देण्याचे निर्देश दिले होते. एनसीबी कार्यालयात गोसावी आणि इतरांना मोकळेपणाने वावरण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे गोसावी यांच्या ताब्यात आरोपी असल्योच चित्र उभे करण्यात आले. तसेच त्यांच्यामार्फत त्यांना एनसीबीच्या कार्यालयातही आणण्यात आले, असेही अहवालात नमूद केले आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आपण एक जबाबदार, शिस्तप्रिय अधिकारी असून  न्यायव्यवस्था आणि सरकारवर माझा विश्वास आहे. न्यायासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ, अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी व्यक्त केली होती.

वानखेडेंचे परदेश दौरे वादात

वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्यांचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेले नाही आणि त्यांच्या परदेश दौऱ्यांवरील खर्चाची चुकीची माहिती जाहीर केली. आपल्या परदेश दौऱ्यांचे स्रोतही त्यांनी जाहीर केलेले नाहीत. वानखेडे यांनी विभागाला न कळवता या खासगी संस्थेबरोबर महागडय़ा मनगटी घडय़ाळांची विक्री आणि खरेदी केल्याचेही चौकशी अहवालात म्हटले आहे.

कुटुंबीयांचा आरोप..

वाशीम : समीर वानखडे हे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. परंतु ते केवळ मागासवर्गीय असल्यामुळे आणि त्यांच्या उपस्थितीत रिसोड तालुक्यातील सवड गावात आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांच्यासह मोठय़ा संख्येने काँग्रेसनेते उपस्थित राहिल्यामुळेच त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचा आरोप समीर वानखेडेंचे बंधू संजय वानखेडे यांनी केला आहे. या कारवाईच्या विरोधात बुधवारी वाशीम येथे निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader