मुंबई: सर्वोच्च टप्प्यावर असलेले भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक, नरमत चाललेली महागाई आणि स्वस्त: होऊ पाहणारे कर्जाचे व्याजदर, मौल्यवान धातू सोन्याच्या दरातील उसळी या पार्श्वभूमीवर  गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न  सरकारी कर्मचाऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर व यासंदर्भातील योग्य मार्गदर्शन शुक्रवारी सकाळी ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ या कार्यक्रमातून केले जाईल. गुंतवणुकीसाठी दिशादर्शक हा  कार्यक्रम केवळ ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अर्थसाक्षरतेच्या उद्देशाने गुंतवणूकदारांच्या विविध वर्गासाठी गुंतवणुकीच्या जागराची मालिका ‘लोकसत्ता’ने या निमित्ताने पुन्हा सुरू केली. याची सुरुवात, ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित  विशेष कार्यक्रमाने होत आहे. आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड प्रस्तुत  ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’चा हा कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) येथे हा कार्यक्रम  २३ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी आर्थिक नियोजनकार कौस्तुभ जोशी हे मार्गदर्शन करतील. कुटुंबाचा नित्य जमाखर्च,  स्वप्नांच्या पूर्ततेसाठी बचत व गुंतवणूक, निवृत्तीनंतर निर्धास्त जीवन जगण्याची तयारी कशी करता येईल, याची मांडणी त्यांच्याकडून केली जाईल.  उपस्थितांच्या प्रश्नांची ते उत्तरेही देतील.  कार्यक्रम नि:शुल्क असून,  पहिल्या रांगेतील काही जागा निमंत्रितांसाठी राखीव  असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.