मुंबई : आधुनिक तंत्रज्ञान साधनांनी आर्थिक सेवेत सुलभता आणली असली, तरी फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. थोडथोडकी बचत करत उभ्या केलेल्या गुंतवणुकीला चलाखीने फस्त करणाऱ्या या वाढत्या घटना पाहता त्यापासून बचावासाठी काय करावे, याची माहिती ‘लोकसत्ता अर्थभान’ मालिकेत रविवारी सायंकाळी पार्ल्यातील विशेष सत्रात दिली जाईल.

बरोबरीने जीवनांत कमावलेल्या संपत्तीचे वारसांमध्ये विना-तंटा हस्तांतरण करणारा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजेच ‘इच्छापत्र’ होय. ‘इच्छापत्र’ का आणि कसे बनवावे तसेच त्याचे महत्त्व काय या प्रश्नांची उत्तरेही यावेळी दिली जातील.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई

हेही वाचा >>>मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश

सध्याच्या काळातील अनिश्चिततेच्या पैलूवरच प्रकाश टाकणारे हे दोन्ही विषय असून, त्याला तोंड कसे देता येईल, याची उकल या मार्गदर्शन सत्रांमधून केली जाईल. आर्थिक साक्षरतेचा भाग म्हणून होत असलेल्या ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रमाचे ‘आदित्य बिर्ला सन लाईफ मुच्युअल फंड’ हे मुख्य प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम रविवारी, १२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, लोकमान्य सेवा संघ, पु. लं. देशपांडे सभागृह, तिसरा मजला, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होत आहे.

कार्यक्रमांत दोन्ही विषयांतील तज्ज्ञ वक्ते म्हणजेच आर्थिक नियोजनकार कौस्तुभ जोशी तसेच सनदी लेखापाल व विधी सल्लागार दीपक टिकेकर हे मार्गदर्शन करतील. उपस्थितांना इच्छापत्र, सायबर फसवणूक आणि गुंतवणूक नियोजनाविषयी त्यांच्या प्रश्न व शंकांचे दोहोंना थेट प्रश्न विचारून निरसन करता येईल. कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश खुला आणि विनामूल्य आहे.

Story img Loader