धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड(DRPPL)ने जगप्रसिद्ध शहर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील नियोजनकार आणि तज्ज्ञांना आपल्या महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी करून आशियातील सर्वात मोठ्या आणि सर्वात चैतन्यशील वसाहतीच्या पुनर्कल्पनेत मोठी झेप घेतली आहे.

डीआरपीपीएल प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर तसेच सासाकी ही रचनाकार फर्म आणि बुरो हॅपोल्ड या सल्लागार कंपनीबरोबर भागीदारी करीत आहे. याशिवाय सिंगापूरमधील तज्ज्ञदेखील या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. हे सर्व धारावीच्या रहिवाशांसाठी जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या दिशेने काम करतील. मुंबईतील क्रांतिकारी सामाजिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्पांसाठी प्रसिद्ध असलेले हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहभागामुळे डीआरपीपीएलची सामाजिक जबाबदारी आणि नावीन्यपूर्ण रचनेसाठी दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित होत आहे.

डीआरपीपीएलने अमेरिकेतील सासाकी ही प्रसिद्ध आंतरशाखीय रचना फर्म आणि बुरो हॅपोल्ड ही ब्रिटनमधील प्रसिद्ध सल्लागार कंपनी यांनाही आपल्याबरोबर घेतले आहे. या दोन्ही कंपन्या शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी विख्यात आहेत. सासाकी कंपनीला ७० वर्षांचा वारसा असून, कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील, अशी शाश्वत रचना तयार करण्यासाठी त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे. तर बुरो हॅपोल्ड शहरांची पर्यावरणीय आणि सामाजिक ओळख अबाधित ठेवून तेथे सर्जनशील आणि मूल्याधारित पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

हेही वाचाः ३२ हजार कोटींहून अधिकची संपत्ती, तरीही मुंबईच्या उद्योगपतींनी केला लोकल प्रवास; कोण आहेत निरंजन हिरानंदानी?

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Mrunal Dusanis New Business
Video : अमेरिकेहून भारतात आलेल्या मृणाल दुसानिसचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण! नवा बिझनेस आहे तरी काय? दाखवली झलक

वर्ष १९६९ मध्ये स्थापन झालेल्या सिंगापूर गृहविकास मंडळाने १२ लाख घरांची चोखंदळपणे उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यातून जागतिक दर्जाच्या एकात्मिक पायाभूत सुविधा आणि एका प्रगतशील समाजाची निर्मिती झाली. या प्रवासातून मिळालेल्या अनमोल कौशल्य व अनुभवांचा उपयोग करून त्यांचा समावेश आपल्या परिवर्तनीय प्रक्रियेत करण्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सिंगापूर हे प्रेरणादायी उदाहरण आहे. आजच्या धारावीसारख्याच झोपड्या, झोपडपट्ट्या आणि वस्ती असे १९६०च्या दशकात सिंगापूरचे चित्र होते. तेथून सुरुवात करत सिंगापूर गृहविकास मंडळाने तेथे १२ लाख घरे उभारली आहेत. त्यात केवळ जागतिक दर्जाच्या एकात्मिक पायाभूत सुविधाच उपलब्ध करून दिल्या आहेत असे नव्हे, तर जगाला हेवा वाटेल असे जीवनमान जगणारा एक प्रगतशील समाजही जोपासला. गेल्या पाच दशकांच्या कालावधीत सिंगापूरच्या शहरी पुनरुज्जीवनातून अनमोल अनुभव गाठीशी असलेल्या व्यावसायिकांकडे जे ज्ञानाचे भांडार आहे, त्याचा उपयोग धारावी पुनर्विकास प्रकल्प करू इच्छित आहे.

अदाणी समूहाने धारावीसाठी स्वतंत्र शौचालये, हवेशीर स्वयंपाकघर आणि कौटुंबिक वास्तव्यासाठी तसेच विश्रांतीसाठी परिपूर्ण खासगी घरांची निर्मिती; गजबजलेल्या दुकानांचा उदय आणि भरभराट करणारे व्यवसाय त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि नोकरीच्या संधींची निर्मिती आणि स्थानिक समुदायाची उन्नती, असे एक वास्तवात येणारे नवजागरणाचे स्वप्न पाहिले आहे.

हेही वाचाः नवीन वर्षात चांगली बातमी, एलपीजी सिलिंडरच्या किमती घसरल्या, किती स्वस्त झाला?

डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ शहरी नूतनीकरण आणि पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन एवढाच नसून त्यापेक्षा अधिक आहे. धारावीतील संस्कृतीचा गाभा जोपासतानाच तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचे आमचे ध्येय आहे. जागतिक दर्जाच्या या अत्युच्च प्रयत्नांकडे आम्ही एकात्मता, सर्वसमावेशकता आणि सामुदायिक सहभागासाठीच्या वचनबद्धतेतून पाहतो. आम्ही आमच्या जागतिक दर्जाच्या भागीदारांचे कौशल्य आणि धारावीकरांचा उत्साह आणि चैतन्य यांच्यातील सुसंवादातून धारावीच्या नागरी पुनर्विकासाचे जगाचे लक्ष वेधून घेईल, असे मॉडेल विकसित करण्याची अपेक्षा करतो, ज्याची अन्यत्र आणि शहरांमध्ये प्रतिकृती राबवली जाऊ शकते.”