धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड(DRPPL)ने जगप्रसिद्ध शहर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील नियोजनकार आणि तज्ज्ञांना आपल्या महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी करून आशियातील सर्वात मोठ्या आणि सर्वात चैतन्यशील वसाहतीच्या पुनर्कल्पनेत मोठी झेप घेतली आहे.
डीआरपीपीएल प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर तसेच सासाकी ही रचनाकार फर्म आणि बुरो हॅपोल्ड या सल्लागार कंपनीबरोबर भागीदारी करीत आहे. याशिवाय सिंगापूरमधील तज्ज्ञदेखील या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. हे सर्व धारावीच्या रहिवाशांसाठी जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या दिशेने काम करतील. मुंबईतील क्रांतिकारी सामाजिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्पांसाठी प्रसिद्ध असलेले हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहभागामुळे डीआरपीपीएलची सामाजिक जबाबदारी आणि नावीन्यपूर्ण रचनेसाठी दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित होत आहे.
डीआरपीपीएलने अमेरिकेतील सासाकी ही प्रसिद्ध आंतरशाखीय रचना फर्म आणि बुरो हॅपोल्ड ही ब्रिटनमधील प्रसिद्ध सल्लागार कंपनी यांनाही आपल्याबरोबर घेतले आहे. या दोन्ही कंपन्या शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी विख्यात आहेत. सासाकी कंपनीला ७० वर्षांचा वारसा असून, कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील, अशी शाश्वत रचना तयार करण्यासाठी त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे. तर बुरो हॅपोल्ड शहरांची पर्यावरणीय आणि सामाजिक ओळख अबाधित ठेवून तेथे सर्जनशील आणि मूल्याधारित पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा