मुंबई : अमलीपदार्थ तस्करीशी संबंधित प्रकरणात आरोपी असलेल्या पोलिसाच्या माध्यमातून आयपीएस अधिकारी के. एम. एम. प्रसन्ना यांच्याबाबत बदनामीकारक आरोप करणे वकील नवीन चोमल यांना भोवले आहे. प्रसन्ना यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी महानगरदंडाधिकाऱ्यांनी चोमल यांना शुक्रवारी दोषी ठरवून त्यांना एक महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, चोमल यांना निर्णयाला आव्हान देता यावे यासाठी न्यायालयाने शिक्षा स्थगित केली.

प्रसन्ना यांनी चोमल यांच्यासह वकील जयेश वाणी यांच्याविरोधातही बदनामीची फौजदारी तक्रार नोंदवली होती. मात्र, वाणी यांनी प्रसन्ना यांची विनाअट माफी मागितली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे, त्यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली.

ghatkopar hoarding case
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित
sujata saunik likely to be first woman chief secretary
सुजाता सौनिक पहिल्या महिला मुख्य सचिव? नितीन करीर यांना निरोप
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Sai Tamhankar on divorce party with Ex Husband
“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!
Vasai, authoritarianism,
शहरबात : एवढा माज येतो कुठून…?

हेही वाचा…खासदार, आमदारांच्या खटल्यांचा तपशील द्या, उच्च न्यायालयाचे सर्व जिल्ह्यांच्या प्रधान न्यायाधीशांना आदेश

चोमल यांनी केलेले आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे सिद्ध करण्यात प्रसन्ना यांना यश आले. शिवाय, चोमल यांनी आपल्या बचावार्थ काहीही पुरावे सादर केले नाहीत किंवा बाजू मांडलेली नाही. यावरून चोमल यांनी प्रसन्ना यांची बदनामी करण्याच्या हेतुने त्यांच्यावर यांच्याबर आरोप केल्याचे सिद्ध होते, असे न्यायालयाने चोमल यांना शिक्षा सुनावताना नमूद केले. आपण एक प्रतिष्ठित वकील असून आपल्याला कारावास झाल्यास आपल्या वकिलीवर आणि अशिलांवर त्याचा विपरित परिणाम होईल, असा दावा चोमल यांनी शिक्षेत दया दाखवण्याची मागणी करताना केली होती. मात्र, चोमल यांनी केलेल्या कृत्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना दया दाखवली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले व चोमल यांना एक महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याशी संबंधित धर्मराज काळोखे या हवालदाराला सातारा पोलिसांनी २०१४ मध्ये अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी अटक केली होती. मरिन ड्राईव्ह पोलिसांनीही त्याला पोलीस ठाण्यातील लॉकरमध्ये अमलीपदार्थाचा साठा लपवल्याप्रकरणी अटक केली होती. या घटनेच्या वेळी प्रसन्ना हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. चोमल यांनी काळोखे यांचे वकीलपत्र घेतले. तसेच, त्याच्या नावे न्यायालयात एक अर्ज करून त्यात सातारा येथील प्रकरणात प्रसन्ना यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा…अतिरिक्त सीईटीची नोंदणी प्रक्रिया आजपासून, ३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज निश्चिती

याबाबतचे वृत्त काही इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर, प्रसन्ना यांनी पोलीस महासंचालकांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. त्याबाबतचा अहवाल साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांनी महासंचालकांकडे सादर केला. त्यात, प्रसन्ना यांच्या सहभागाबाबत तपासात काहीच पुढे आलेले नसल्याचे आणि काळोखे याची त्यादृष्टीने चौकशीही करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर, प्रसन्ना यांनी चोमल आणि वाणी याच्याविरोधात बदनामीची फौजदारी तक्रार दाखल केली.