लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : धुळे येथून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत तहकूब केली. मात्र, पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीखही शुक्रवारी संपत असल्याने रहमान यांची लोकसभा निवडणूक लढविण्याचे शक्यता धूसर झाली आहे.

स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात कोणतीही अडचण नाही. तरीही केंद्र सरकारकडून स्वेच्छानिवृत्तीची मागणी मान्य केली जात नाही, असा दावा करणाऱ्या रहमान यांच्या याचिकेवर गेले काही दिवस सुनावणी सुरू आहे. सध्या रहमान यांच्या वकिलाचा युक्तिवाद सुरू असून अद्याप केंद्र सरकारचा युक्तिवाद व्हायचा आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय निर्णय देईल. ही स्थिती लक्षात घेता शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी न्यायालय रहमान यांच्या याचिकेवर निर्णय देण्याची शक्यता कमी आहे.

आणखी वाचा-औचित्य महाराष्ट्र दिनाचे… ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी

दरम्यान, रहमान यांच्याकडून केल्या गेलेल्या युक्तिवादाशी सहमत नसल्याचे सकृतदर्शनी मत मुख्य न्यायमू्र्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. दर्शविणे कठीण असल्याचे प्रथमदर्शनी मत व्यक्त केले. रहमान यांच्याविरोधात २००२ ते २०२२ या कालावधीत तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यातील दोन तक्रारी या त्यांच्या पहिल्या पत्नीशी संबंधित आहेत. तिसरी तक्रार ही सेवेत असतानाही समान नागरी कायद्याविरोधी आंदोलनात सहभागी झाल्याबाबत आहे. तिसरी तक्रार गंभीर असून त्याकडे डोळेझाक करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले. तसेच, याचिकेची सुनावणी शुक्रवारपर्यंत तकहूब केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ips officer rahmans chances of contesting the election are less mumbai print news mrj