अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला मुंबई एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं ताब्यात घेतलं आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी एनसीबीनं ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरापासून मुंबईतील ड्रग्ज रॅकेट आणि त्यामागे असणाऱ्या अनेक मोठ्या नावांची चौकशी एनसीबीकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आज एनसीबीनं इकबाल कासकरला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीरमधील एका अंमली पदार्थ प्रकरणामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.

 

जम्मू-काश्मीरहून पंजाबमध्ये जवळपास २५ किलो चरस आणण्यात आलं होतं. हे चरस तिथून मुंबईमध्ये वितरीत केलं जाणार होतं, असा संशय एनसीबीला असून त्यासंदर्भात इक्बाल कासकरची चौकशी केली जाणार आहे. याआधी देखील इकबाल कासकरविरोधात ईडी अर्था अंमलबजावणी संचलनालयाने खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.

Story img Loader