मुंबई : अंबरनाथ येथे आयआरसीटीसीद्वारे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर केला जातो. मात्र, अंबरनाथ येथील काकोळे ग्रामस्थांकडून आयआरसीटीसी आणि परप्रांतीय ठेकेदाराविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे रेलनीर बाटलीबंद पाण्याची पुरवठा व्यवस्था खंडित झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयआरसीटीसीने मुंबईतील रेल्वे स्थानकांतील रेलनीरचा पुरवठा पुढील सूचनेपर्यंत बंद केला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)द्वारे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकात आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये केला जातो.अंबरनाथ येथील ‘रेलनीर’च्या कारखान्यातून बाटलीबंद पाणी पोहोचवण्याचे काम मालवाहतुकीद्वारे काकोळे ग्रामस्थ करत होते. मात्र, मे २०२४ पासून वाहतूक ठेकेदार मनोज खाद्यायान भांडार मुझ्झफरपूर याने मालवाहतुकीचा कारभार हाती घेतला. त्यामुळे १२ मालवाहतूकदार ग्रामस्थांची सेवा बंद झाली. तर, वाहतूक ठेकेदार भांडार यांनी ही सेवा मिलेनियम ग्रुप ऑफ कंपनीकडे दिली. परिणामी, काकोळे ग्रामस्थ आर्थिक कोंडीत सापडले आहेत. याबाबत आयआरसीटीसी, रेलनीर, वाहतूक ठेकेदार यांच्या विरोधात ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.

हेही वाचा >>>तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, निवडणूक आयोगाचे आदेश; मंगळवारपर्यंत मुदत

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा/कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकात, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकात ‘रेलनीर’चा बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद राहणार आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांनी पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटल्यांची विक्री केली जाईल.

चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न

‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नवीन वाहतूक ठेकेदार नेमला. मात्र, मालवाहतुकीचे काम पुन्हा काकोळे ग्रामस्थांना मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि नवीन वाहतूक ठेकेदार यांच्या बाजू ऐकून मध्यम मार्ग काढला जाईल. मालवाहतूक खंडित झाल्याने पुढील दोन दिवस मुंबईतील रेल्वे स्थानकात ह्यह्णरेलनीरह्णह्ण बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद राहील, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.

मे २०२४ रोजी काकोळे गावातील १२ मालवाहतूकदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांची सेवा खंडित केली. त्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. – नरेश गायकर, उपसरपंच, काकोळे गाव, अंबरनाथ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irctc has stopped the supply of railneer from the railway stations in mumbai amy