मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळामध्ये शनिवारी सकाळी तांत्रिक समस्या येत होती. प्रवाशांनी संकेतस्थळावरून तिकीट काढण्याचा प्रयत्न केला असता अनेक त्रुटी येत होत्या. तसेच संकेतस्थळावर ‘पुढील तासभर तिकीट आरक्षण, तिकीट रद्द करण्याची सेवा बंद राहणार’, असा संदेश प्रवाशांना दिसत होता. त्यामुळे प्रवाशांना सकाळी तिकीटे काढता आली नाहीत.
हेही वाचा – मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
गेल्या अनेक आठवड्यांपासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळात सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रवाशांनी समाज माध्यमावर प्रचंड संताप व्यक्त केला. सकाळच्या वेळी तत्काळ तिकीट काढताना संकेतस्थळ बंद होत असल्याने, प्रवाशांना तत्काळ तिकिटे खरेदी करता येत नाही. दरम्यान, सकाळी काही कालावधीसाठी संकेतस्थळ बंद होते. त्यानंतर संकेतस्थळ पूर्ववत झाले.