लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील नव्या-जुन्या सर्व प्रकल्पातील इमारतींवर लोखंडी शिडी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर लोखंडी जाळ्यांच्या उद्वाहनाऐवजी स्टीलचे बंद दरवाजे असलेली उद्वाहने बसविणेही अनिवार्य करण्यात आले आहे. गोरेगावमधील झोपु योजनेतील इमारतीला ऑक्टोबरमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर झोपु प्राधिकरणाने १५ मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे विकासकांना बंधनकारक आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

गोरेगावमधील उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला ऑक्टोबरमध्ये आग लागली होती. या आगीत सात जणांचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर झोपु योजनेतील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सुचविलेल्या शिफारसींनुसार झोपु प्राधिकरणाने १५ मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यासंबंधीचे परिपत्रक ८ डिसेंबर रोजी जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे विकासकांना बंधनकारक आहे. झोपु योजनेतील सर्व जुन्या – नव्या पुनर्वसन आणि विक्री योग्य इमारतींमध्ये लोखंडी शिड्या, लोखंडी जाळी असलेल्या उद्वाहनाऐवजी स्टीलचा बंद दरवाजा असलेली उद्वाहने बसविणे, अग्निसुरक्षा पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेणे, मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याकडून विक्री-पुनर्वसन इमारतींमधील प्रतिबंधात्मक उपायांची खात्री करून घेणे बंधनकारक आहे.

आणखी वाचा-मुंबई : नाताळनिमित्त बाजारपेठ सजली

अंशतः वा पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र घेण्यापूर्वी सर्व अग्निसुरक्षा उपायांचे पालन केले असल्याची हमी देणे अनिवार्य असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, इमारतीतील अग्निशामक उपकरणे, उद्वाहन आणि जीवन सुरक्षा उपकरणे चांगल्या स्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सुरक्षा सल्लागाराकडून वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलैमध्ये महानगरपालिकेला सादर करणे आवश्यक असणार आहे. ही जबाबदारी सोसायटीची असेल, असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तसेच भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर १० वर्षांनी सोसायटीने भविष्यातील देखभालीसाठी अग्निशमन आणि जीवरक्षक उपकरणे व उद्वाहन देखभाल कंपनीशी करार करणे अनिवार्य असणार आहे.

Story img Loader