जोगेश्वरीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जोगेश्वरी पूर्व परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या इमारतीखाली उभ्या असलेल्या एका रिभावर शनिवारी ( ११ मार्च ) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास लोखंडी सळई पडली. या दुर्घटनेत रिक्षात बसलेल्या एका महिलेसह सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोगेश्वरी पूर्व परिसरातील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एआयएम ग्रुप व मलकानी डेव्हलपर्सतर्फे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असताना सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास इमारतीवरून खाली उभ्या असलेल्या रिक्षावर लोखंडी सळई पडली. यावेळी रिक्षामध्ये बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अयात आसिफ शेख (७) ही मुलगी गंभीर जखमी झाली.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंची पुन्हा शिवरायांबरोबर तुलना, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले…

जोगेश्वरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या दोघींना मुंबई महानगरपालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, अयातच्या नातेवाईकांनी तिला महानगरपालिकेच्या रुग्णालयातून कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.