परळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान प्रस्तावित असलेला पाचवा आणि सहावा मार्ग रद्द करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. या मार्गात असलेल्या पुलांचे तसेच जवळपासच्या इमारतींचे हस्तांतरण करण्यामध्ये अडचणी असल्यामुळे हा मार्ग रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग टाकण्याच्या प्रकल्पाचा समावेश होता. मात्र परळ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या मार्गावर नवीन मार्गासाठी जागाच उपलब्ध नाही, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितल़े    

Story img Loader