सोने चांदीच्या व्यापाऱ्यातील देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘रिद्धिसिद्धी बुलियन लिमिटेड’ या कंपनीवर मंगळवारी प्राप्तिकर खात्याने छापे घातले. मुंबईतील कार्यालयावर घातलेल्या छाप्यात तब्बल ५० कोटी रुपयांची रोकड तसेच २० हजार कोटी रुपयांच्या हवाला व्यवहाराच्या नोंदी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातून हे छापे घातल्याची शक्यता असून अद्याप त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सोमवारी प्राप्तिकर खात्याने रिद्धिसिद्धी बुलियन लिमिटेडच्या झवेरी बाजार आणि कॉटन ग्रीन येथील कार्यालयांवर छापे घातले. मंगळवारीसुद्धा ही कारवाई सुरू होती. या कारवाईत सुमारे ५० कोटी रुपये रोख तसेच २० हजार कोटी रुपयांच्या हवाला व्यवहारांच्या नोंदी सापडल्याची माहिती प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिली. कंपनीचे संचालक पृथ्वीराज कोठारी यांच्या निवासस्थानीही छापे घालण्यात आले. मात्र दोन्ही ठिकाणी कोठारी उपस्थित नव्हते. प्राप्तिकर विभागाचे हे नियमित सव्र्हेक्षण असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सराफाच्या आयपीलमधील व्यवहाराच्या अनुषंगाने हे छापे घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातील फरारी सट्टेबाज पवन आणि संजय जयपूर यांच्याशी संबंधित डायऱ्या या छाप्यात अधिकाऱ्यांना सापडल्या आहेत. पवन छाब्रा आणि संजय छाब्रा हे दोघे भाऊ असून पवन आणि संजय जयपूर नावाने सट्टेबाजीच्या व्यवहारात आहेत. जयपूरमध्ये त्यांचा सराफीचा मोठा व्यवसाय असून हवालामार्फत ते दुबई, पाकिस्तानात सट्टेबाजीच्या पैशांचा व्यवहार करत होते. सध्या ते फरारी असून त्यांच्याविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वीच अल्पेश पटेल या हवाला एजंटला अटक केली होती. प्राप्तिकर विभाग मुंबई, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानातील सराफांवरही छापे घालण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी प्रकरणात सराफांचा मोठा पैसा गुंतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सट्टेबाजांशी संबंधित नोंदवह्य़ा
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातील फरारी सट्टेबाज पवन आणि संजय जयपूर यांच्याशी संबंधित डायऱ्या या छाप्यात अधिकाऱ्यांना सापडल्या आहेत. पवन छाब्रा व संजय छाब्रा हे दोघे भाऊ असून पवन आणि संजय जयपूर नावाने सट्टेबाजीच्या व्यवहारात आहेत.