लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल व कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूतचे सोमवारी निधन झाले. शौचालयात पडल्यामुळे डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला होता.

पंचनामा करताना आदित्यच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मार लागल्याचे आढळून आले होते. मार लागल्यामुळे डोक्याच्या डाव्या बाजूला सूज आली होती, मात्र रक्तस्त्राव झाला नसल्याचे निदर्शनास आले होते. शौचालयात पडल्यामुळे डोक्याला मार लागून आदित्यचा मृत्यू झाला असावा अशा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्रप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले. आदित्यच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात करण्यात आले. लवकरच त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त होणार आहे.

आणखी वाचा-मुंबई: अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार

आदित्यने मॉडेलिंगपासून मनोरंजन विश्वातील करिअरला सुरुवात केली होती. अनेक मालिका व चित्रपटांतही त्याने काम केले होते. ‘क्रांतिवीर’, ‘मैने गांधी को नही मारा’ या चित्रपटांसह ‘एम टीव्ही’ या वाहिनीवरील ‘स्प्लिट्सविला’ या रिएलिटी शोमध्येही आदित्य सहभागी झाला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is suspected that aditya singh rajput died due to a blow to the head mumbai print news mrj