ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा करीत प्रकरणातून दोषमुक्त करण्याची पत्रकार जिग्ना वोराची विनंती विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
आपण निर्दोष असून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा करीत जिग्नाने दोषमुक्त करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र तिच्या अर्जाला तीव्र विरोध करीत डे यांच्या हत्येप्रकरणात तिचा सहभाग असल्याचे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात या पुराव्यांचा समावेश असल्याचा आणि या हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारांपैकी जिग्ना हीसुद्धा एक असल्याचाही दावा पोलिसांतर्फे करण्यात आला. पोलिसांचे म्हणणे मान्य करीत न्यायालयाने जिग्नाची दोषमुक्त करण्याची विनंती फेटाळून लावली.

Story img Loader