मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपांतर्गत जे.जे रुग्णालयाच्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांपासून अटक असलेल्या डॉक्टरची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- विश्लेषण : मुंबईतील स्थलांतरित प्रवाळ वाचणार का? त्यांचे महत्त्व काय?

जे जे रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. रिहान कलाथील यांच्या गाडीने २८ मार्च रोजी पहाटे दक्षिण मुंबईतील उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार आदित्य देसाई (२५) या तरुणाचा पुलावरून खाली पडून मृत्यू झाला. डॉ. रिहान हे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे त्यांच्या वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक केली होती. अटकेपासून सहा महिने कारागृहात असलेल्या डॉ रिहान यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने त्यांची याचिका मान्य करून त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा- धारावी पुनर्विकासात अपात्र रहिवाशांनाही घरे; चार चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर

याचिककर्त्यांच्या वैद्यकीय चाचणी अहवालानुसार, त्याच्या रक्तात मद्याचे अंश सापडले. परंतु त्याचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी होते. शिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून याचिककर्त्याला आणखी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही. फौजदारी कायदा जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद मानतो. तसेच आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपीला गुन्हेगार मानता येत नाही, असे न्यायालयाने डॉ. रिहानला जामीन मंजूर करताना नमूद केले.

हेही वाचा- नवी मुंबईतील बेकायदा बांधकामे; जबाबदार व्यक्तींवर कारवाई आवश्यक : उच्च न्यायालय

घटनेच्या प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या जबाबनुसार, याचिककर्ता हा पुलाच्या मधोमध पण संथगतीने गाडी चालवत होता. दुर्दैवाने मृत दुचाकीस्वार समोरून आला आणि याचिककर्त्याच्या गाडीने त्याला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा पुलावरून खाली पडून मृत्यू झाला, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. याचिककर्ता हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आहे. त्यामुळे त्याची रुग्णांना गरज आहे. शिवाय त्याला पुढील शिक्षणही घ्यायचे आहे, असे नमूद करून या बाबींचाही त्याला जामीन देताना विचार करण्यात आल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले.