मुंबई : एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर एचआयव्ही संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये १ एप्रिल २००४ रोजी पहिले एआरटी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राला २० वर्ष पूर्ण झाली असून, या २० वर्षांमध्ये जे.जे. रुग्णालयामध्ये ४३ हजार ८० रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. सध्या जे.जे. रुग्णालयामध्ये तीन एआरटी केंद्र कार्यरत आहेत.

जे.जे. रुग्णालयामध्ये १ एप्रिल २००४ मध्ये डॉ. अलका देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एआरटी केंद्राची सुरूवात करण्यात आली. १४ सप्टेंबर २०१६ रोजी दुसऱ्या एआरटी तर १ डिसेंबर २०१७ ला तिसऱ्या एआरटी केंद्राला सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या एआरटी सुविधेतंर्गत ४३ हजार ०८० रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहे. त्यातील पहिल्या एआरटी केंद्रामध्य ५०९५, तर दुसऱ्या एआरटी केंद्रामध्ये ११९१ आणि तिसऱ्या एआरटी केंद्राच्या माध्यमातून ३७९ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळाले आहेत.

security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
mmc created special app to curb bogus doctors and to inform citizens about registered doctors
क्यूआर कोडद्वारे डॉक्टरांची ओळख पटवणे सोपे ! नोंदणीकृत सदस्यांची वैद्यक परिषदेच्या ॲपवर नोंदणी

हेही वाचा…मोनोरेल, मेट्रो प्रकल्पात आता अदानीची वीज; टाटाच्या वीजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय

एचआयव्हीसह जगणाऱ्या रूग्णांना विनामूल्य मिळणाऱ्या या औषधांमुळे दिलासा मिळाला. जेजे रुग्णालयामध्ये सुरू झालेल्या या पहिल्या एआरटी केंद्राला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यामध्ये जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, एमडॅक्सचे विजयकुमार करंजकर, नोडल अधिकारी डॉ. प्रिया पाटील, डॉ. धीरुभाई राठोड, तसेच मागील काही वर्षापासून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रुग्णांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

तरीही वर्षाला सहाशे रुग्णांचे आव्हान कायम

२० वर्षांपूर्वी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मुलांची संख्या मोठी होती. त्यात आता घट झाली आहे. मात्र तरीही प्रत्येक वर्षी रुग्णालयाच्या एआरटी केंद्रामध्ये ६०० रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येतात. विविध पातळ्यांवर एचआयव्ही आजाराचा संसर्ग, त्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपचार याबद्दल सातत्याने जनजागृती केली जाते. एचआयव्ही रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यावर विचार करण्याची गरज रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली.

हेही वाचा…एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी

नवीन आयुष्य भेट मिळाले

एआरटी केंद्राने २० वर्षांची पूर्तता केल्यासंदर्भात सुरू येथील वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. आशाला (नाव बदलले आहे) एचआयव्हीचा संसर्ग झाला तेव्हा तिच्या कुटुंबाने तिच्या जगण्याची उमेद सोडून दिली होती. त्यावेळी तिची मुलगी चार वर्षाची होती. मुलगी कळती होईपर्यंत तरी हिला जगवा, अशी विनवणी तिच्या पालकांनी केली होती. आशाने एआरटी उपचारपद्धती व्यवस्थित घेतली. एचआयव्हीसह ती मागील चोवीस वर्ष सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहे.