ओला आणि सुका कचरा स्वतंत्र डब्यांमध्ये न ठेवणारे घरमालक तसेच सोसायटय़ांविरुद्ध यापुढे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी अशांना कारागृहाची हवाही खावी लागणार आहे.
ओला आणि सुका कचरा स्वतंत्र ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून नेहमी करण्यात येते. मात्र मुंबईकरांकडून त्याला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच यापुढे ओला आणि सुका कचरा एकत्र ठेवणाऱ्या घरमालकाविरुद्ध सुरुवातीला दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईलाही न जुमानणाऱ्या आधी नोटीस पाठवून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
ओला-सुका कचरा वेगळा न केल्यास थेट तुरुंगात रवानगी!
ओला आणि सुका कचरा स्वतंत्र डब्यांमध्ये न ठेवणारे घरमालक तसेच सोसायटय़ांविरुद्ध यापुढे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी अशांना कारागृहाची हवाही खावी लागणार आहे.
First published on: 09-02-2013 at 04:39 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jail if not divid the wet suka garbage