जयपूर – मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने चार जणांची हत्या केल्याची घटना सोमवारी (३१ जुलै) समोर आली. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गुजरातच्या वापी स्थानकाजवळ आली असताना आरपीएफ जवान चेतन सिंह याने रेल्वेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चार जणांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. चेतन सिंहने एक्सप्रेसच्या तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि मीरा रोड स्थानक येण्याच्या काही वेळ आधी गाडी थांबवून बाहेर उडी मारली. चेतन सिंह पळून जाण्याच्या बेतात असताना मीरा रोड येथे तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला पकडलं. चेतन सिंह याला आज पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं.

या हत्येप्रकरणी तपास करण्यासाठी तसेच चेतन सिंहची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर चेतन सिंह याचे वकील सुरेंद्र लांडगे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. तसेच चेतन सिंहशी काय बोलणं झालं? याबाबतची माहितीदेखील लांडगे यांनी दिली.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती

चेतन सिंहचे वकील सुरेंद्र लांडगे म्हणाले, पोलिसांनी आज (१ ऑगस्ट) न्यायालयापुढे सांगितलं की, आम्हाला याप्रकरणी तपास करायचा आहे. आरोपीची मानसिक स्थिती चांगली नाही. त्याची वैद्यकीय तपासणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे पोलिसांनी चेतन सिंहच्या कोठडीची मागणी केली. त्याचबरोबर पोलिसांनी सांगितलं, हा खूप गंभीर गुन्हा आहे. आरोपीची वैद्यकीय चाचणी बाकी आहे. आरोपीच्या वैद्यकीय चाचणीनंतर पुढचा तपास आणि चौकशी केली जाईल.

आरोपीचे वकील सुरेंद्र लांडगे म्हणाले, आम्हाला आरोपीशी बोलायला फार वेळ मिळाला नाही. आम्ही त्याला विचारलं, नेमकं काय घडलं? त्यावर तो म्हणाला, मी काहीच केलेलं नाही, मी गोळीबार केला नाही. मला काही माहिती नाही. मी निर्दोष आहे.

हे ही वाचा >> “हल्लोखोर आरपीएफ जवान भाजपाचा…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत असदुद्दीन ओवैसींचा टोला

दरम्यान, या गोळीबारात ठार झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मंगळवारी पश्चिम रेल्वेने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.