मुंबई : सागरी जैवविविधतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी (बीएनएचएस) आणि महाराष्ट्र वन विभाग-कांदळवन कक्ष ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सस्तन प्राणी, पक्षी ह्यांच्या नोंदी आणि अभ्यासासाठी ‘जलचर’ हे मोबाइल उपयोजन (ऍप्लिकेशन) तयार करण्यात आले आहे. या उपयोजनाच्या माध्यमातून सागरी जलचरांचे संवर्धनही करण्यासही मदत होणार आहे.

जलचर हे ॲप मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये वापरता येणार असून सागरी, पशू-पक्ष्यांच्या नोंदी त्यात करायच्या आहेत. स्थानिक मच्छीमार, संशोधक, तटरक्षक दल, नौदल कर्मचारी हे या उपयोजनावर दिसलेल्या प्राणी, पक्ष्यांची माहिती नोंदवू शकतील. तसेच त्यांना नोंदवलेल्या जलचरांची माहिती मिळू शकेल. महाराष्ट्रातील किनारपट्टी लगतच्या सागरी अधिवासात आढळणाऱ्या समुद्री प्राण्यांची संपूर्ण माहिती या उपयोजनाच्या माध्यमातून संकलित करून त्याद्वारे सागरी जलचरांचे संवर्धन करण्याचा उद्देश आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत, परेश मोकाशी यांच्या मु. पो. बोंबिलवाडीला हिटलर सापडला

दरम्यान, जीपीएस प्रणालीचा वापर करुन प्राणी, पक्ष्यांची छायाचित्रेही अपलोड करता येणार आहेत. एखादा सागरी जलचर किनारपट्टीवर येणार असेल (स्ट्रँडिंग) तर त्याची पूर्वसूचना या प्रणालीच्या माध्यमातून वन विभागाला मिळू शकेल. हंगामी जलचरांबाबत अधिक तपशीलात नोंदीचे संकलन करता येऊ शकेल. त्यामुळे जलचरांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाय योजना करणे शक्य होणार आहे. तसेच तातडीची मदत हवी असल्यास तशी नोंद करण्याचीही तरतूदही या प्रणालीत आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाय करण्यासाठी संबंधित यंत्रणांची मदत मिळू शकेल.

हेही वाचा – मोटरगाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जलचर या प्रणालीचे हॉर्नबिल हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमात बीएनएचएसचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते आणि कांदळवन कक्षाचे प्रमुख अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व्ही.रामाराव यांच्या उपस्थितीत मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे मानद सचिव डॉ. भारत भूषण, संचालक किशोर रिठे, डॉ. सथीया सेलवम व प्रकल्प प्रमुख डॉ. रेश्मा पितळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, सागरी प्रजातींच्या संवर्धनात स्थानिक मच्छिमार बांधवांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या प्रणालीच्या त्यांचा सक्रिय सहभाग असणार असल्याचे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले. जलचर ॲप हे महाराष्ट्राच्या समृद्ध सागरी जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी आणि संवर्धनामध्ये स्थानिकांचा सहभाग वाढवण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. ही उपयोजन गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येईल.