मुंबई : मराठवाडय़ातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांना उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच भेटणार असल्याचे त्यांना भेटलेल्या आमदारांकडून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जालन्यातील या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. आंदोलकांनी हिंसक रूप घेतल्याने जाळपोळ, रास्ता रोको आदी सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढले जात आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या गावाला भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे काही आमदार मुंबईत पवार यांना भेटल्याचे समजते. या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भात पवार यांच्याशी चर्चा केली. शिवाय अजित पवार यांनी आंदोलकाची भेट घ्यावी अशी विनंती केल्याचे सूत्रांकडून समजते.