ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून, हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश दिला जावा, असे ठाम मत व्यक्त केले आहे. जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर तृप्ती देसाई यांना सलाम ठोकला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंदिर आणि दर्गा असा कोणताही भेदभाव पाळला नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष तृप्ती देसाई यांना माझा सलाम, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. अख्तर यांच्या या ट्विटवर नेटिझन्सने भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अख्तर यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. याआधी देखील अख्तर यांनी आपल्या भाषणातून ‘भारत माता की जय’ म्हणण्यास विरोध करणाऱया ओवेसी बंधूंना प्रत्युत्तर दिले होते.

Story img Loader