सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याचं म्हणत निषेध केला. तसेच यामुळे समाजात जातीभेद वाढेल, असा इशारा दिला. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयंत पाटील म्हणाले, “खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल, असं मला वाटत नाही. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल. अशाप्रकारे शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : देवस्थानांच्या जमिनी हडप केल्याची तक्रार देणाऱ्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल – जयंत पाटील

“समाजातील जातीभेद आणखी वाढेल”

“अशाप्रकारे प्रत्येक कामासाठी जात विचारणं सर्व सरकारी योजनांमध्ये सुरू होईल. त्यामुळे समाजातील जातीभेद आणखी वाढेल. याचं भान सरकारने ठेवलं पाहिजे. सरकारने असे प्रकार ताबोडतोब बंद केले पाहिजे,” असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil comment on farmer caste inquiry for fertilizer distribution rno news pbs