जयंत पाटील यांचा विधानसभेत आरोप
गुजरातपेक्षा महाराष्ट्रात सरासरी एक लाख रुपयांहून अधिक दराने सौरपंप खरेदी करण्यात आली असून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. यासंदर्भात लोकसत्ताने दिलेल्या बातमीचा संदर्भ त्यांनी दिला.
दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदींविषयी विधानसभेत सुरू असलेल्या चच्रेमध्ये बोलताना पाटील यांनी सौरपंप खरेदीचा मुद्दा मांडला. गुजरात हे भाजपच्या दृष्टीने आदर्श असताना त्यांच्यापेक्षा लाखभराने अधिक दर देऊन कृषिपंपांची खरेदी का करण्यात आली, असा सवाल पाटील यांनी केला. निविदांमध्ये साधारणपणे समानता असताना एवढी किंमत कशामुळे वाढली, सुमारे १० हजार पंप महागडय़ा दराने खरेदी केल्याने यात गरव्यवहार झाला, असे सकृद्दर्शनी वाटते व त्यात चूक काय, अशी विचारणा पाटील यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा