शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण, शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. या विठ्ठलाला बडव्यांना घेरलं आहे. या बडव्यांना बाजूला करा, आम्ही सगळे तुमच्याकडं परत येऊ, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटील म्हणाले, “आमच्याबरोबर अनेक लोक होती. शरद पवारांनी अनेकांना मोठ्या संधी दिल्या. पण, आता विठ्ठलाच्या भोवती बडवे होते, असं सांगितलं जात आहे. छगन भुजबळ दोन वर्षांनी तुरुंगातून बाहेर आले होते. त्यावेळी शरद पवारांनी पुण्यात छगन भुजबळांच्या डोक्यावर महात्मा फुलेंच्या विचारांची पगडी ठेवली होती. तेव्हा बडवे आडवे आले नाहीत.”

हेही वाचा : “सर्वात जास्त अपमान अन्…”, अजित पवारांचा उल्लेख करत धनंजय मुंडेचं भावनिक भाषण

“ज्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची चेष्टा केली, त्यांच्या मांडीला-मांडी लावून बसला. २०१९ साली उद्धव ठाकरे सरकारचा शिवतीर्थावर शपथविधी होणार होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी दोन जणांची नावे देण्यास मला सांगितलं होतं. शरद पवारांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं दिलं. त्यावेळी बडवे आडवे आले नाहीत. बोलायला बऱ्याच गोष्टी आहेत. पण, मला वाद घालायचा नाही,” असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : “वय आता ८२ झालं, ८३ झालं तरीही…” अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या निवृत्तीचाच मुद्दा केला उपस्थित

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

“शरद पवार आम्हाला सांगतात की, माझा फोटो बॅनर्सवर वापरू नका. मात्र, शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. या बडव्यांना बाजूला करा, आम्ही सगळे तुमच्याकडं परत येऊ. आपण एकत्र सत्तेत बसू,” असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil reply chhagan bhujbal over badave all over sharad pawar ssa
Show comments