मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी सोन्याचे मौल्यवान दागिने, मोबाइल चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. काळाचौकी पोलीस ठाण्यात दागिने, मोबाइल चोरीच्या किमान सात जणांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारींनुसार सुमारे सात लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असून त्यात सोन्याचे दागिने, कॅमेऱ्याचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणातील एका गुन्ह्यात दोन महिलांना ताब्यात घेतले.

लालबागमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान दागिने आणि मोबाइल चोरीला गेल्याच्या किमान सात घटना घडल्या आहेत. लालबाग परिसरातील काळाचौकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात काळाचौकी पोलिसांनी दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात एका महिलेचा समावेश आहे.

Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
we the documentary maker Dheeraj akolkar
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
The rambunctious bull came straight out of the ring
खतरनाक! उधळलेला बैल थेट कूंपण तोडून बाहेर आला… पुढच्या पाच सेकंदात जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

हेही वाचा – एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाची दुसरी फेरी २६ सप्टेंबरपासून

शिवडी येथील गृहिणी असलेल्या अमृता माने (३८) लालबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर गणेश विसर्जन मिरवणूक पहायला गेल्या होत्या. ‘मुंबईचा राजा’ची मिरवणूक पाहत असताना प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन एक महिला व पुरुष यांनी माने यांना घेरले. यावेळी आरोपींनी त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. आरडाओरडा झाल्यानंतर तेथील स्वाती जाधव (२०) व मनिषा शिंदे (२५) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना नोटीस बजवण्यात आली असून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आरोपींनी चोरलेले मंगळसूत्र १५ ग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. त्याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लालबाग परिसरात विसर्जन मिरवणुकीत दागिने चोरीला गेल्याची आणखी पाच महिलांनी तक्रार केली आहे. पुष्पा अगरवाल, संध्या पोफळकर, अनुष्का मसुरकर, हेमलता कुशाळे व प्रभावती नागपूरे यांनी दागिने चोरीला गेल्याची तक्रार काळाचौकी पोलिसांकडे केली आहे. त्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात २० ग्रॅम सोनसाखळी व पेंडंट (किंमत एक लाख ३० हजार रुपये), मोबाइल फोन (किंमत १० हजार रुपये), १३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (किंमत ६५ हजार रुपये), १३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (किंमत ६५ हजार रुपये), १३ ग्रॅमची सोनसाखळी (किंमत ६५ हजार रुपये) व २८ ग्रॅमचा गोफ (किंमत एक लाख ४० हजार रुपये) अशी एकूण चार लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

हेही वाचा – पदव्युत्तर आयुर्वेद, होमियोपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

याशिवाय गणेश मिरवणुकीचे छायाचित्रण करण्यासाठी आलेल्या छायाचित्रकाराचा महागडा कॅमेराही चोरीला गेला आहे. २५ वर्षीय तेजस गावडे छायाचित्रण करीत असताना प्रचंड गर्दीमुळे ते खाली पडले. त्यावेळी निकॉन कंपनीचा महागडा कॅमेरा व लेन्स चोरीला गेली. गावडे यांच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी अनोळखी चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.