मुंबई : महालक्ष्मीच्या सातरस्ता परिसरातील रिषभ ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या दागिने खरेदीच्या निमित्ताने आलेले ग्राहकांनी शस्त्राच्या धाक दाखवून दोन कोटी रुपयांचे दागिने लुटल्या प्रकार घडला. आरोपींनी मालकासह कामगारांना मारहाण करून बांधून पलायन केले. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी दोन व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चिंचपोकळी परिसरात राहणारे व्यावसायिक भवरलाल धरमचंद जैन (५०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना : सात महिन्यांनंतर व्यावसायिक अरशद खानला अटक

महालक्ष्मीजवळील सातरस्ता येथील साने गुरुजी मार्गावरील लक्ष्मीदास वाडीत रिषभ ज्वेलर्सचे दुकान आहे. यामध्ये २ हजार ४५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ कोटी ९१ लाख ६० हजार किंमतीच्या दागिन्यांसह १ लाख ७६ हजार किंमतीचे २२०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपयांची रोख व एक वायफाय राउटर आरोपींनी पळवला आहे. तक्रारीनुसार, दोन अनोळखी व्यक्ती रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास दुकानात दागिने घेण्याच्या बहाण्याने आले.

हेही वाचा >>> वांद्रे, निर्मलनगरमध्ये म्हाडाची ३० घरे; संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाअंतर्गत ११० संक्रमण शिबिराचे गाळेही उपलब्ध होणार

काही कळण्यापूर्वीच त्यांनी जैन आणि दुकानातील कामगार पुरण कुमारला बंदुक, चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने त्यांना बांधून ठेवले. तसेच ठार मारण्याची धमकी देऊन दुकानातील सुमारे दोन कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटला. याबाबतची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. सीसी टीव्हीद्वारे महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.