अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पोलीसांना दिले. जिया खानची आई रबिया हिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास करण्याची मागणी केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने नव्याने तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले.
जिया खानने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप करीत एक ऑक्टोबर रोजी रबिया खान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जियाचा खून करण्यात आला असून नंतर तिने आत्महत्या केल्यासारखा बनाव रचण्यात आल्याचे त्यांनी याचिकेमध्ये म्हटले होते. एका खासगी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही याचिकेसोबत जोडला होता. त्यामध्ये जियाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मुंबई पोलीसांनी योग्य पद्धतीने तपास केला नसल्याचा आरोप करीत हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही रबिया यांनी केली होती.

Story img Loader