अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली याची मंगळवारी कसून चौकशी केली. सुरज मंगळवारी दुपारी आई-वडिलांसह जुहू पोलिस ठाण्यामध्ये गेला होता. तिथेच त्याची चौकशी करण्यात आली.
सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी दहा वाजून ४० मिनिटांच्या सुमारास जिया सुरजबरोबर मोबाईलवर बोलली होती. तिच्या मोबाईलमधील कॉल्सवरून ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सुरजला चौकशीसाठी बोलावण्यात आले.
सुरज हा जियाचा प्रियकर होता. त्या दोघांमध्ये सोमवारी रात्री नेमके काय बोलणे झाले. जियाच्या आत्महत्येचा आणि सूरजच्या बोलण्याचा काही संबंध होता का, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सूरज पांचोलीला चौकशीसाठी बोलावले होते.
जियाने सोमवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान जुहूमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप उलगडलेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा