अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सूरज पांचोलीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. 
जियाने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल हा सूरजचा होता. त्या दोघांमध्ये आठ मिनिटे बोलणे झाले होते. त्याचबरोबर हे बोलणे झाल्यावर सूरजने जियाला एसएमएस पाठवले होते, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सूरजला अटक केली होती. जियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची कबुली सूरजना पोलिसांनी दिलीये. आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधी जियाने एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये सूरजचे नाव नसले, तरी ते त्यालाच लिहिण्यात आले होते, असा जियाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. हे पत्र पोलिसांना मिळाले असून, त्यामध्ये जियाने गर्भपात केल्याची माहितीदेखील लिहिली आहे.

Story img Loader