अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या करून नंतर तिचा मृतदेह लटकविण्यात आल्याचा आरोप तिची आई रबिया खान हिने केला आहे. त्यामुळे रबिया यांचा पुन्हा जबाब नोंदवण्याचे आणि तिच्या आरोपांचा तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जुहू पोलिसांना दिले आहेत.
न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  जियाने गळफास लावून आत्महत्या केली. परंतु तिने सिलिंग फॅनमध्ये ओढणी लटकवली कशी, तिने स्टूल अथवा तत्सम वस्तूचा वापर करणे आवश्यक होते काय यासंबंधी पोलिसांच्या तपासात वाच्यता नसल्याने अन्य मुद्दय़ांचेही स्पष्टीकरण न्यायालयाने पोलिसांकडे मागितले असता रबिया यांनी याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे जबाबाच्या वेळी सांगितले नव्हते, असा दावा पोलिसांतर्फे करण्यात आला. रबिया यांनी केलेल्या आरोपांच्या दिशेने तपास करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत  पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

Story img Loader