अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येमागील सत्य एक दिवस नक्कीच बाहेर येईल, असे मत या प्रकरणी अटक झालेल्या सूरज पांचोलीची आई झरीन वहाब यांनी व्यक्त केले. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सूरजला अटक केली. जिया आणि सूरज यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते, अशी कबुली सूरजने दिलीये. या पार्श्वभूमीवर झरीना यांनी सूरजची पाठराखण केली.
पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताहेत. आमच्यावर कितीही आरोप झाले, तरी सत्य काय आहे, ते एकदिवस नक्कीच बाहेर येईल, याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे, असे झरीना यांनी म्हटले आहे. जियाची आई रबिया काहीही म्हणू देत. मी देखील सूरजची आई आहे. माझा मुलगा कसा आहे, हे मला माहितीये. जियाच्या आत्महत्येस माझा मुलगा जबाबदार नाही. तू खूपच शांत स्वभावाचा आहे. ज्यादिवशी जियाने आत्महत्या केली, त्यादिवशी तो तिथे गेलासुद्धा नव्हता, असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader