अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या केली नसून, तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करीत या संपूर्ण प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करण्याची मागणी करणारी याचिका जियाच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.
गळफास लावल्यानेच जिया खानचा मृत्यू
एक ऑक्टोबर रोजी ही याचिका दाखल करण्यात आली. त्यावर पुढील आठवड्यात एका न्यायमूर्तींच्या पीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील दिनेश तिवारी यांनी सांगितले.
जियाचा खून करून नंतर तिने आत्महत्या केल्यासारखा बनाव रचण्यात आल्याचा आरोप तिची आई रबिया अमिन यांनी केला. चार महिन्यांपूर्वी जिया खान तिच्या खोलीमध्ये मृतावस्थेत आढळली होती. खासगी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने जियाने आत्महत्या केली नसून, तिचा खून झाला असण्याची शक्यता वर्तविणारा अहवाल दिला आहे. याच अहवालाच्या आधारे रबिया अमिन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
जियाला मारहाण केल्याची सूरज पांचोलीची कबुली
जियाचा प्रियकर सूरच पांचोली याला वाचविण्यासाठी पोलीसांनी या घटनेचा व्यवस्थित तपास केलेला नाही. त्यामुळेच या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी रबिया अमिन यांनी केली. सूरज हा अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. त्यामुळे त्यांनी पोलीसांवर दबाव टाकल्याचा आरोपही रबिया अमिन यांनी केला आहे.
.. तर जियाचा जीव वाचला असता 

Story img Loader