बाबासाहेब पुरंदरेंना दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रद्द करण्याची मागणी करत  जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सांस्कृतिक मंत्री  विनोद तावडे यांच्या सरकारी निवासस्थानी घुसल्या. जिजाऊ ब्रिगेडच्या १५ ते २० महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वत:ला तावडे यांच्या बंगल्यात कोंडून घेतले. मरिन लाईन्स पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.  दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. बाबासाहेबांचं आजपर्यंतचे कार्य मोठं असून त्याबाबत प्रश्न उपस्थित करता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले. तसेच याचिकाकर्त्यांनी केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना  दहा हजारांचा दंडदेखील ठोठावण्यात आला.

Story img Loader