विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा रस्त्यांसाठी निधी मतदारसंघात नेण्याचं काम आव्हाड यांनी केलं, असं म्हणत आमदार प्रताप सरनाईक यांनी कौतुक केलं. पण, ठाणे महापालिकेचे बादशाह मतदारसंघातील रस्ते उकरत आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

विधानसभेत बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, “जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात होत असलेल्या काँक्रिट रस्त्यांसंदर्भात चर्चा केली. गेली १५ वर्षे आमदार म्हणून काम करतो. पण, माझ्या मतदारसंघातील विकासकामे आणि क्राँक्रिटच्या रस्त्यांसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची वाट पाहावी लागली. पण, १४ वर्षाच्या कार्यकाळात काँक्रिट रस्त्यांचा निधी जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात गेला.”

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत

हेही वाचा : किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

“शिवसेनेची सत्ता महापालिकेत असताना अधिकाऱ्यांबरोबर जितेंद्र आव्हाड यांचे संबंध चांगले होते. त्यामुळे जास्तीत जास्त निधी मतदारसंघात नेण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलं,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील विकासकामांचं कौतुक केल्याबद्दल प्रताप सरनाईक यांचा मी आभारी आहे. २००९ च्या पूर्वी कळवा-मुंब्र्यात चालण्यासाठी रस्ते नव्हते. पण, आता मतदारसंघातील सर्व क्राँक्रिकचे आहेत. मात्र, दुर्दैवाने तुमचे ठाणे महापालिकेचे बादशाह माझ्या मतदारसंघातील रस्ते उकरत आहेत.”

हेही वाचा : आठ तासांचे VIDEOS आणि पक्षातील मराठी महिलांचा छळ; पेनड्राईव्ह जमा करत अंबादास दानवेंचा सोमय्यांवर गंभीर आरोप

“सगळ्या रस्त्यांची वाट लावली जात आहे. महापालिकेचा पैसे वाया घालवण्यात येत आहेत,” असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

Story img Loader