मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही अद्याप अजित पवारांसह त्यांच्या गटातील मंत्र्यांना खाते मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर ते आज (१२ जुलै) दिल्लीला गेले. हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत अजित पवारांना टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज छोट्या साम्राज्याचे राजे होते. दिल्लीत त्यांना ५ हजारांची मनसबदारी दिली, तेव्हा ते ती मनसबदारी लाथाडून महाराष्ट्रात परत निघून आले होते. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हीच महाराष्ट्राची भूमिका आहे.”

“एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला…”

“एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला सुभेदार बनायला चालला आहे. मोठ्या राज्यात सुभेदार होण्यापेक्षा, लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं आहे,” असं म्हणत त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.

“सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय”

सोशल मीडियावर लिहिणाऱ्या तरुणांवर होणाऱ्या कारवाईवर जितेंद्र आव्हाड “सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांना उचलून नेलं जात आहे. हे तरुण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून व्यक्त होतात. ते कुणाला आई-बहिणीवरून शिव्या देत नाहीत.”

“सरकार हे जास्त दिवस असं करू शकणार नाही”

“आपले विचार स्वतंत्रपणे मांडणे हा या देशातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुलभूत अधिकारांमध्ये हा अधिकार दिला आहे. हा मुलभूत अधिकार हिरावून घेणे, त्यांचा आवाज दाबणे बरोबर नाही. सरकार हे जास्त दिवस असं करू शकणार नाही,” असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला.

हेही वाचा : “जितेंद्र आव्हाडांमुळे पक्षाचं नुकसान झालं”, अजित पवारांच्या आरोपाला शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “भाजपाबरोबर…”

“आमचे ४५ आमदार तर आमच्याकडेच आहेत”

“काँग्रेसचे आमदार जास्त आहेत हे कशावरून? आमचे ४५ आमदार तर आमच्याकडेच आहेत. आम्ही त्यांच्याकडे पत्र पाठवणार आहोत आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या पत्रावर सही करा अशी मागणी करणार आहोत,” असं सूचक वक्तव्यही जितेंद्र आव्हाडांनी केलं.