राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गुरुवारी राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यपाल. के. शंकरनारायणन यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात आव्हाड यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचे बुधवारीच स्पष्ट झाले होते. विजयकुमार गावित यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे कॅबिनेट दर्जाच्या एका मंत्रिपदाची जागा रिक्त होती. त्या जागी आव्हाड यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
राणे-कदमांचा मुखभंग