राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसनव्यवस्था विरोधी पक्षांच्या बाकांवरच केली जावी. असे मागणी करणार पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिलं आहे, अशी माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच, ९ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे, असेही आव्हाड यांनी सांगितलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बंडखोर आमदारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणार का? असा सवाल विचारल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवार बंगळुरूतील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांच्या नेत्यांशी ते चर्चा करतील. त्यानंतर शरद पवार दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेत बदल नाही.”

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
ajit pawar sharad pawar (7)
Sharad Pawar NCP: सुप्रिया सुळे वगळता शरद पवार गटाच्या ७ खासदारांना होती अजित पवार गटाकडून ‘ऑफर’, पडद्यामागे घडतंय काय?
Sanjay Shirsat On Sujay Vikhe Patil
Sanjay Shirsat : “देशातील भिकारी येथे येऊन जेवतात असं म्हणणं हा साई भक्तांचा अपमान”, सुजय विखेंच्या विधानावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

हेही वाचा : राष्ट्रवादी की काँग्रेस, विधानसभा विरोधी पक्षनेते पद कुणाकडे? जयंत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले…

३५ पेक्षा अधिक सदस्यांचा पाठिंबा असताना बंडखोर आमदारांनी शरद पवारांना दैवत मानत आशीर्वाद मागण्यामागचं कारण काय? यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “जे बोलतात त्यांना जाऊन विचारा. मी ३५ वर्षे झालं शरद पवारांना दैवत मानत आलो आहे.”

हेही वाचा : शरद पवार आणि बंडखोर आमदारांच्या भेटीत काय घडलं? जयंत पाटलांनी दिली माहिती; म्हणाले, “सर्वांनी…”

राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे का? असे विचारल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, “मी व्हीप जारी केला नाही. विधानसभा अधिवेशनाला उपस्थित राहावा, तेवढा पक्षादेश काढण्यात आला आहे.”

पुरोगामी विचारांवर ठाम राहण्याची भूमिका शरद पवारांनी व्यक्त केली? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, “शरद पवार पुरोगामी विचारांच्या भूमिकेवर ७० वर्षे ठाम आहेत.”

Story img Loader