पुढील महिन्यात घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास भारतीय साहित्य क्षेत्रातील ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेले तीन पुरस्कारप्राप्त साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.   हे संमेलन महाराष्ट्राबाहेर पंजाब   येथील घुमान या गावी होणार आहे.
संत नामदेव यांनी पंजाब येथे भागवत धर्माचा प्रसार केला. घुमान येथे त्यांचे मंदिरही असून तेथे ते बाबा mu06नामदेव म्हणून म्हणून ओळखले जातात. या सोहळ्यास अन्य भाषांमधील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त तीन साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. यात गुरुदयाळ सिंह (पंजाबी), प्रा. रहेमान राही (काश्मिरी) आणि केदारनाथ सिंह (हिंदूी) यांचा समावेश आहे.  गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोप सोहळ्यास अन्य भाषांमधील ज्येष्ठ साहित्यिकांना गेल्या काही वर्षांपासून बोलाविण्यास सुरुवात झाली आहे. घुमान साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भरत देसडला, संमेलन आयोजक असलेल्या ‘सरहद्द’ संस्थेचे संजय नहार यांच्या पुढाकाराने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. या तीन ज्येष्ठ साहित्यिकांसह भारतातील अन्य प्रादेशिक भाषांमधील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक तसेच पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष गुरुभजन सिंह-गिल उपस्थित राहणार आहेत.
अन्य भाषक साहित्यातील विचार व प्रवाह यांचे आदानप्रदान, साने गुरुजी यांनी पाहिलेले ‘आंतर भारती’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे या उद्देशाने घुमान साहित्य संमेलनास  तीन ज्येष्ठ साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. साहित्य, संस्कृती, संगीत यांचे प्रांत आणि भाषाभेद विसरायला लावून राष्ट्रीय एकात्मता साधण्यात योगदान आहे आणि सध्याच्या वातावरणात राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता आहे, असे नहार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा