राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या १५ जिल्ह्यामधील युवक युवतींसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने चालक तथा वाहक पदाच्या ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यासंबंधीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे एसटी महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी येथे दिली.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महामंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यावर्षी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या १५ जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत  प्रवास पास देण्याचा निर्णय ही एसटी महामंडळाने यापूर्वीच घेतला आहे.  त्यानंतर आता या दुष्काळी जिल्ह्यतील युवकांना रोजगार मिळावा  या हेतूने महामंडळाने चालक-वाहक पदांची संधी उपलब्ध करून देण्याचा, निर्णय घेतला आहे.

ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना परीक्षा शुल्कात ५० टक्कय़ांची सवलत देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना या व्यतिरिक्त औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवायच्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा विकल्पही स्वीकारता येईल. ज्या जिल्ह्यात भरती होईल तेथेच निवृत्तीपर्यंत त्या कर्मचाऱ्यास काम करावे लागेल.

भरती होणार असलेले जिल्हे आणि प्रक्रिया

ही भरती औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या पंधरा जिल्ह्यत होईल. परंतु यापैकी ११ जिल्ह्यत ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यत चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत. या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यतील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना ज्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त आहेत तिथे नियुक्त्या दिल्या जातील. तसेच ज्यावेळी या चार जिल्ह्यत चालक तथा वाहक पदाच्या जागा रिक्त होतील तेव्हा या उमेदवारांना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यत नियुक्ती देण्यात येईल, असे  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. या सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा घेतल्या जातील. केवळ बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यतील युवक उर्वरित ११ ठिकाणी कुठेही एका ठिकाणी परीक्षेस उपस्थित राहू शकतील. उर्वरित जिल्ह्यामधील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया लवकरच राबविली जाईल.